विरूष्काच्या बॉडीगार्डला आहे इतका पगार! कमाई जाणून थक्क व्हाल…

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी म्हणजे बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातली एक अत्यंत गाजलेली जोडी आहे. या दोघांचेही चाहते जगभर पसरलेले आहेत. हे दोघे जिथेही जातील, तिथे लोक लगेच गर्दी करतात. त्यांना बघितलं, की लगेच लोकांचा त्यांच्या भोवती गराडा पडतो. काही फॅन्स तर अगदी त्यांच्या मागे मागेच फिरत असतात. ते जिथे जातील, तिथे हजेरी लावतात. अशा लोकांपासून अर्थातच विराट आणि अनुष्काला सांभाळून राहावे लागते. यावेळी मदतीला येतो, तो त्यांचा बॉडीगार्ड.

विराट आणि अनुष्काच्या बॉडीगार्डचे नाव सोनू आहे. मात्र हा केवळ त्यांचा एक बॉडीगार्ड नाहीये. विराट आणि अनुष्का आपल्या सगळ्या स्टाफला अगदी कुटुंबाप्रमाणे वागवतात. तसेच ते सोनूलाही वागवतात. सोनू नेहमीच त्यांच्याबरोबर असतो. क्रिकेटचे स्टेडियम असो वा चित्रपटाचा सेट, सोनू नेहमी विराट आणि अनुष्कासोबत त्यांचे रक्षण करताना दिसतो.

लोकांना म्हणजेच पत्रकार किंवा फॅन्सना अनुष्का आणि विराटच्या अगदी जवळ जाण्यापासून थांबवणं, त्या दोघांना कोणताही धोका होणार नाही हे पाहणं अशी अनेक कामं सोनूला करावी लागतात. तो सावलीसारखा सतत त्यांच्याबरोबर असतो. प्रवासात देखील तो त्यांच्याबरोबर असतो. त्यामुळे त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. त्यामानाने त्याला पगारही तितकाच तगडा मिळतो.

विराट आणि अनुष्काच्या सगळ्याच सुरक्षा रक्षकांना भलभक्कम पगार मिळतो. एका रिपोर्ट नुसार, सोनूला वर्षाला १.२ कोटी पगार मिळतो. इतकेच नाही, तर विराट आणि अनुष्का आपल्या अंगरक्षकांचे वाढदिवस देखील साजरे करताना दिसतात. ‘झिरो’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अनुष्काने सोनूचा वाढदिवस सेटवर साजरा केला होता.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी २०१६ मध्ये लग्न केले होते. दोघांच्याही रिलेशनशिपची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. त्यानंतर दोघांनीही थाटामाटात लग्न केले होते. विराट आणि अनुष्काला एक मुलगी देखील आहे. तिचे नाव त्यांनी वामिका ठेवले आहे. वामिकाच्या जन्मानंतर अनेक सेलिब्रेटींनी विरूष्काचे अभिनंदन केले होते.

काही दिवसांपूर्वीच विराटने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे सध्या विराटला बीबीसीआयने वनडे आणि टी-२० प्रकारच्या क्रिकेटमधून काढून टाकले आहे. त्यामुळे सध्या या प्रकारांत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा सांभाळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच विराटने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.