‘बप्पी दा’ यांच्या निधनाने पसरली शोककळा.! पहा पाठीमागे ठेवून गेले एवढी संपत्ती…पैसे, दागिने देखील…

मित्रहो आपल्या अतरंगी संगीतातून रसिकांच्या मनावर जादू करणारे बप्पी दा आता आपल्यात नाहीत. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण त्यांचे तिथेच निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शांतता पसरली आहे. त्यांच्या पॉप आणि रॉक म्युजिकने श्रोत्यांची एका वेगळ्याच संगीताशी त्यांनी ओळख करून दिली आहे. त्यांच्या आवाजाची, संगीताची अनेकांना खूप सवय लागली होती मात्र त्यांची प्राणज्योत मावळली त्यामुळे अनेकजण खूप दुःखी झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

ही खबर माहिती झाल्यावर अनेकांचे चेहरे उदास झाले असून, प्रत्येकाच्या डोळ्यात नम्रता उतरली आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, क्रिकेटपटू युवराज सिंह, आदित्य राज, हंसल मेहता, यांसारख्या अनेक नामवंत लोकांनी त्यांना आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या संगीताच्या चाहत्यांनी देखील आपले मन व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मित्रहो बप्पी दा यांनी आपल्या मृत्यूनंतर अफाट संपत्ती मागे ठेवली आहे.

चला आज आपण जाणून घेऊया त्यांची एकूण संपत्ती,आपणा सर्वांना माहीत आहे की बप्पी यांना सोन्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे ते नेहमीच सोने परिधान करत होते, बप्पी हे एका अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेसली यांचे खूप मोठे चाहते होते. या रॉकस्टार ला बप्पी यांनी अनेक कार्यक्रमात भरपूर दागदागिने घालताना पाहिले होते, आणि त्यांची ही सवय बप्पीना खूपच भावली. मग पुढे त्यांनी सुद्धा आपल्या आवडत्या संगीतकारांची स्टाईल वापरायला सुरुवात केली. म्हणून तर त्यांना भारताचा गोल्ड मॅन म्हणले जाते.

बप्पी हे फक्त गायकच न्हवते तर त्यांनी पॉलिटिक्समध्ये देखील सहभाग घेतला होता.२०१४ मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली होती, त्यावेळी बप्पी यांच्या संपत्तीचे विवरण समोर आले होते. आता या जुन्या रिपोर्ट्सनुसार त्यांच्या कडे एकूण ७५२ ग्रॅम सोने व ४.६२ किलो चांदी होती. जेवढे बप्पी दा सोन्याचे चाहते आहेत, तितकीच त्यांची बायको चित्रांशी देखील चाहती आहे. २०१४ मध्ये चित्रांशी जवळ ९६७ ग्रॅम सोने होते, तसेच ८.९ किलो चांदी असून ४ लाखच्या वर डायमंड होते.

त्यांची ही संपत्ती व सोने जाणून कोणीही थक्क होऊन जाईल, कारण अनेकांना निरनिराळे छंद असतात पण बप्पी दा यांच्या कुटुंबाला सोन्याची आवड आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो पाहून नेटकऱ्यांची नेहमी चर्चा सुरू असायची. पण आता बप्पी दा हे जग सोडुन गेल्याने त्यांचे अनेक चाहते खुप उदास झाले आहेत, मात्र जरी त्यांनी या जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांची गाणी आजही आणि उद्याही आपल्या सोबत राहतील हे नक्की. अमच्याकडूनही बप्पी दा यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!