काय सांगता! बॉलीवूडमधील ‘ही’ अभिनेत्री चक्क विकतेय मासे तुम्हालाही बसेल धक्का; पाहा फोटो

बॉलीवूड क्षेत्रामधील सर्वच कलाकारांची लाईफस्टाईल अधिक उच्च स्तरावरची असते. सर्वसामान्य माणसांप्रमाणे ते त्यांच आयुष्य जगत नाहीत. त्यामुळेच त्यांच लाईफस्टाईल सतत चर्चेचा विषय बनत असत. अनेक चाहते देखील आपल्या आवडत्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याची लाईफस्टाईल प्रमाणे जगायला सुरुवात करतात.

चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना सोशल मीडियावर फॉलो करत असतात. त्याचबरोबर आवडत्या कलाकारांनी केलेल्या प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंट करून प्रचंड प्रेम व प्रतिसाद देत असतात. अनेक कलाकार असे आहेत की, त्यांच्यावर आज उपासमारीमुळे मिळेलते काम करण्याची वेळ आली आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ‘टिना दत्ता’ प्रचंड लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची अभिनयाची शैली उत्तम असल्याने तिला अभिनय क्षेत्रात प्रचंड पसंती होती. टीना दत्ताने ‘उतरण’ या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मालिकेत टीनाने ‘इच्छा’ही भूमिका साकारली होती.

यानंतर टीनाने ‘डायन’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. टीना दत्ता सोशल मीडियावर सतत ॲक्टिव असते. ती नेहमीच तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल नेहमी काहीना काही नवीन माहिती मिळत असते.

नुकताच टीना दत्ताने आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक वेगळाच फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे तिचे चाहते हैराण झाले आहेत. ती या फोटोमध्ये चक्क मासे विकताना दिसत आहे. यामुळे अनेक वापरकर्त्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

एक वापरकर्ता म्हणाला की, “तुझ्यावर ही वेळ खरच आली आहे का?, की तू शूटिंग साठी हे करत आहेस.” तर काही वापरकर्ते असे देखील म्हणत आहेत की, “कसे किलो दिले मासे.”

टीना दत्ताच्या या पोस्टमुळे सर्वत्र चर्चा होत असून, तिने हा फोटो का शेअर केला आहे व खरच तिच्यावर ही वेळ आली आहे का असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. टिना दत्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तीन फोटो शेअर केले आहेत. तिने एका फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती मासे विकायला बसलेली दिसत आहे. टीनाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

टीना दत्ताच्या या पोस्ट वर अनेक वापरकर्ते सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. अनेक वापरकर्ते तिला जबरदस्त ट्रो’ल देखील केल जात आहे. एक वापरकर्ता म्हणाला, ‘निष्पाप प्राण्यांची हत्या थांबवा !!’ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘बोंबिल कसे दिले?’ तिसरा वापरकर्ता म्हणाला, ‘ही नवीन मालिका येत आहे का?’ आणखी एक वापरकर्ता म्हणाला, ‘मच्छी मार्केट,’तिच्या या पोस्टला अनेक वापरकर्त्यांना अशा प्रकारच्या कमेंट करत टीना दत्ताला ट्रो’ल करत आहे.