काय सांगता! बॉलीवूडमधील ‘ही’ अभिनेत्री चक्क बॉलीवूड सोडून झाली साध्वी..

बॉलिूडमधील अभिनेत्री ममता कुलकर्णी नुकतीच आता 49 वर्षांची झाली आहे. ममताचा जन्म 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला होता. तिने ‘आशिक आवारा’, ‘करण-अर्जुन’ यासारख्या चित्रपटात अभिनय करून चाहत्यांचे मन जिंकले आहे.

मात्र, 90 च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये से-क्स सिम्बॉल म्हणून ओळख निर्माण करणारी ममता आता साध्वी झाली आहे. गेल्या दोन दशकांपासून लाइमलाइटपासून दूर असलेल्या ममताने आता अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. 2013 मध्ये तिचे एक पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

1991 मध्ये ममताने तिच्या करिअरची सुरुवात ‘ननबरगल’ या तामिळ चित्रपटामधून केली होती. 1992 मध्ये ‘तिरंगा’ चित्रपटाद्वारे तिने बी-टाऊनमध्ये पदार्पण केले. 1993 च्या ‘आशिक आवारा’ या चित्रपटाने ममताला स्टारपद बहाल केले होते. या चित्रपटासाठी तिला ‘फिल्मफेअर न्यू फेस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर ती ‘वक्त हमारा है’, ‘क्रांतिवीर’, ‘करण अर्जुन’, ‘बाजी’ या चित्रपटांमध्ये झळकली. 2002 मध्ये आलेला ‘कभी तुम कभी हम’ हा तिचा अखेरचा चित्रपट ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ममता कुलकर्णीने दुबईमध्ये राहणाऱ्या विकी गोस्वामी या ‘अंडर वर्ल्ड ड्रग माफियाशी’ लग्न केले आहे. परंतू, ममताने नेहमीच तिच्या लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले आहे.

ममता म्हणाली की, “मी कधीच कोणाबरोबर लग्न केलेले नाही. हे खरं आहे की, माझे विकीवर प्रेम होते. मात्र, त्यालादेखील हे समजेल आहे की, आता माझं पहिलं प्रेम ईश्वर आहे.”

अभिनेत्री आता बनली साध्वी
एकेकाळी तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदाकारीने चाहत्यांचे मन जिंकणारी ममता कुलकर्णी आता साध्वी बनली आहे. तिने बॉलिवूड क्षेत्र सोडून आता अध्यात्माच्या मार्ग निवडला आहे. 2013 मध्ये तिचे ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगिनी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यावेळी ममता कुलकर्णी म्हणाली होती की, “काही लोक जगाच्या कार्यासाठी जन्माला येतात, तर काही भगवंतासाठी. माझा जन्म देखिल देवासाठी झाला आहे.”