जितेंद्र आणि राजेश खन्ना यांनी जेव्हा श्रीदेवी यांना २ तास ठेवले होते मेकअप रूममध्ये कोंडून! जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा…

बॉलिवूड मध्ये काय होईल याचा काही नेम नसतो म्हणतात ना ‘कर नाही तर डर कशाला!’ अश्याच पद्धतीची बॉलिवूडची परिस्थिती आहे. बॉलिवूड मध्ये दि’वं’गत अभिनेता राजेश खन्ना आणि जया प्रदा हे एका दशकातील सुपरस्टार आहेत. त्यांनी एकत्र मिळून खूप साऱ्या चित्रपटात काम केली आहेत जया या राजेश खन्ना यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान आहेत तरीही या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली. त्या दोघांनमध्ये खूप चांगली मैत्री सुद्धा होती. पण एकेदिवशी राजेश खन्ना यांनी जया प्रदा यांना मेकअप रूम मध्ये २ तास कों’डून ठेवलं होतं.

जया प्रदा त्यांच्या काळात खूप अदाकारी असणाऱ्या आणि सुंदर दिसणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या, त्यांनी त्यांच्या काळात खूप सुपरस्टार कलाकारांसोबत स्क्रीन शेयर केली आहे. या त्यांच्या लिस्ट मध्ये अभिताभ बच्चन पासून राजेश खन्ना, धर्मेंद्र, ऋषी कपूर यांसारख्या दिगग्ज अभिनेत्याची नावे आहेत. जया प्रदा पेक्षा २० वर्षांनी मोठे असलेले अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी इं’टि’मेंट सीन दिला होता.

ही गोष्ट १९८४ च्या ‘मकसद’, चित्रपटाविषयी आहे. या चित्रपटात राजेश खन्ना आणि जया प्रदा याचबरोबर जितेंद्र आणि श्रीदेवी देखील स्क्रीन शेयर करत होत्या. त्या दिवसांत जया प्रदा आणि श्रीदेवी यांच्यात कॅटफाइट चालवायची. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करूनही दोन्ही अभिनेत्रींमध्ये जास्त बोलणे झाले नाही.

‘मकसद’, या चित्रपटाच्या सेटवर मात्र जया प्रदा आणि श्रीदेवी यांची बनायची नाही दोघीजण फुगून बसलेल्या असायच्या, ही गोष्ट राजेश खन्ना यांना पचली नाही. राजेश खन्ना आणि अभिनेते जितेंद्र हे दोघे मिळून त्यांनी एक आयडिया लावली की दोघांनाही एका खोलीत बंद करायचे. राजेश खन्नाला वाटले की यामुळे या दोघांशी एकमेकांनसोबत बोलणे सुरू होईल.

तर मग राजेश खन्ना यांनी श्रीदेवी आणि जया प्रदा यांना मेकअप रूम मध्ये २ तास अडकवून ठेवले. २ तासांनी जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. जया प्रदा आणि श्रीदेवी खोलीच्या दोन कोपऱ्यात एकट्या बसल्या होत्या. दोघांमध्ये बोलणे झालेच नाही. दोघेही बॉलिवूड मध्ये काम करत राहिल्या पण त्यांची एकमेकांनबद्दलची स्पर्धा कधीच संपली नाही.