सनी लिओनी जेव्हा शुद्ध मराठीत बोलते… ऐकून हैराण व्हाल!

बॉलिवूड इंडस्ट्री जरी हिंदी भाषेवर चालत असली आणि या इंडस्ट्री मध्ये काम करणारे बहुतांश लोक हे हिंदी भाषिक असले, तरी ही इंडस्ट्री ज्या भूमीवर उभी आहे ती भूमी मराठी आहे. मुंबई मध्ये बॉलिवूड साम्राज्य पसरलं आहे. मुंबई महाराष्ट्राची केवळ राजधानीच नाही, तर महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे मुंबई मध्ये राहणाऱ्या लोकांना आणि पर्यायाने बॉलिवूड इंडस्ट्री मधील कलाकारांनाही मराठी यायला हवी, असा बऱ्याच जणांचा अट्टाहास असतो.

त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी बऱ्याचदा मराठी भाषा बोलताना दिसतात. विशेषतः जेव्हा ते एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावतात, तेव्हा ते मराठी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कर्मभूमीचा मान ठेवत हे कलाकार मराठी भाषेचाही तितकाच आदर करताना दिसतात. मात्र एखादा बॉलिवूड कलाकार स्पष्ट मराठी मध्ये बोलताना ऐकल्यावर आपला आपल्या कानांवर विश्वासच बसत नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

एखाद्या बॉलिवूड सेलिब्रेटी कडून अचानक मराठी भाषा ऐकायला मिळाल्यावर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो. असाच काहीसा धक्का अलीकडेच मराठी प्रेक्षकांना बसला होता. निमित्त होतं ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०२१’ या पुरस्कार सोहळ्याचं. वेगवेगळ्या क्षेत्रातील स्टायलिश सेलिब्रेटींना दरवर्षी दै. लोकमत तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीही हा पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये मोठ्या धूमधडाक्यात पार पडलेला पाहायला मिळाला.

या पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रेटींसह बॉलिवूड हॉट स्टार सनी लिओनीने देखील हजेरी लावली होती. यावेळी ती चक्क मराठी बोलताना दिसली. पुरस्कार सोहळ्यात सनीला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यादरम्यान होस्टने सनीला विचारले की आपण मुंबई यामध्ये राहतो आणि लोकल भाषा मराठी आहे. तर आपण वेगळे काहीतरी करू, असे होस्टने सुचवले. यावर सनीने ताबडतोब ‘नको नको’ असे चक्क मराठी मध्ये म्हणत होस्टला नकार दिला.

त्यानंतर बीयुनिक (Beyounick) स्टेज वर आला. त्यावेळी देखील सनी लिओनी होस्टला स्पष्ट मराठी मध्ये ‘गप्प बस’ असं बोलताना आढळून आली. विशेष म्हणजे, सनी हे दोन-तीन मराठी शब्द स्वतःहून उस्फूर्तपणे बोलली. तिला कुणाचीही मदत मिळाली नव्हती. तिला असं मराठी बोलताना ऐकून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सनी लिओनीला मराठी बोलता येत नसलं तरी ती दोन मराठी चित्रपटांमध्ये दिसली आहे. सुपरहिट मराठी चित्रपट ‘बॉईज’ मध्ये ती ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या गाण्यावर डान्स करताना दिसून आली होती. ‘आमदार निवास’ या चित्रपटात देखील तिने ‘शांताबाई’ गाण्यावर एक आयटम नंबर केला होता.