अभिनेता रणवीर सिंगला प्रेमात पाडणारी मराठमोळी राशी शिंदे नक्की आहे तरी कोण..?

मित्रहो स्वकष्टाने या अभिनय क्षेत्रात मानाचे स्थान मिळणारा अभिनेता रणवीर सिंग सोशल मीडियावर हल्ली पुन्हा एकदा खूप चर्चेत आला आहे. रणवीर आणि दीपिका यांची जोडी अनेकांना खुप आवडते, त्या दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयातून विशेष लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी एकत्र अभिनित केलेला पहिला चित्रपट “राम-लीला” च्या सेटवर पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती आणि ही भेट मैत्रीतून प्रेमात कधी मिसळली हे त्यांनाही कळले नसावे. बॉलिवूड मधील एकदम हॉट फिट जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

मात्र आता सोशल मीडियावर रणवीर सिंग एका छोट्याशा दीपिकाच्या प्रेमात पडला आहे, तिच्या अभिनयावर तो भलताच फिदा झाला आहे. ही सोशल मीडिया फेम दुसरी कोणी नसून राशी शिंदे आहे, तिचा एक व्हिडिओ रणवीरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओ मध्ये राशी दीपिकाच्या राम लीला चित्रपटातील एक लोकप्रिय सिन लीप सिंक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा सिन खूप इमोशनल आहे आणि राशीने तो सिन हुबेहूब अभिनेत्री दीपिका सारखाच वठवला आहे.

या सिन मध्ये तिने आपली वेशभूषा देखील अगदी तशीच बनवली असल्याने रसिकांना ती दीपिकाची लहान प्रतिमा वाटतेय. या अप्रतिम अभिनयाला पाहुन सोशल मीडियावर चहुबाजूंनी तिचे फार कौतुक होत आहे. सर्वांच्या कौतुकाची मानकरी ठरलेली ही राशी नेमकी कोण आहे…..? तर मित्रहो राशी शिंदे ही एक मराठी मुलगी आहे, ती एक सोशल मीडिया स्टार आहे. छोटे छोटे डॉयलॉग, स्किट, लीप सिंकचे व्हिडीओ ती नेहमीच शेअर करत असते.

तिचे सोशल मीडियावर अनेक अकाउंट असून, फॅन फॉलोविंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. राशीचे मिलियन पेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. इतक्या लहान वयात नेटकऱ्यांच्या हृदयाचा ठोका बनलेल्या राशीचा जन्म २४ जून २००८ साली झाला होता. ती मूळची शिर्डीची आहे. काही काळ तिथे राहिल्यानंतर ती आता मुंबई मध्ये वास्तव्यात आहे. मित्रहो आम्ही सांगू इच्छितो की celebretiyqna या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार राशीचे महिन्याचं उत्पन्न ७० हजार रुपये असून तिला युट्युब कडून मानाचे सिल्व्हर बटनही मिळाले आहे.

राशीने म्युझिक व्हिडीओ मध्ये काम केले आहे, तसेच तिने शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम केले आहे शिवाय ती लवकरच झी मराठी वरील एका शोमध्ये दिसणार आहे. अनेक व्हिडीओ मध्ये राशी अभिनेत्री सारखे कपडे घालून प्रसिद्ध झालेल्या डॉयलॉग वर लीप सिंक करत असते, ती अजून वयाने लहान असल्याने तिने तिच्या आईच्या म्हणजेच अश्विनी शिंदे यांच्या नावावर सोशल मीडियावर अकाउंट काढले आहे. ती खूपदा आपल्या आईसोबत व्हिडीओ मध्ये दिसते. तिचे सर्व अकाउंट तिच्या आई सांभाळतात.

राशी खूप गुणी असून, तिच्यात खूप चांगली कला आहे. तिची अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा. तिच्या भावी आयुष्यासाठी तिला भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.