तू कोणाशी लग्न करणार…? या प्रश्नावर साराने दिले असले उत्तर! म्हणाली मी मामासोबत…

मित्रहो कमी वेळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली अभिनेत्री म्हणजे सारा अली खान होय. तिने आपल्या सुंदर अभिनयाने आणि स्वभावासोबत सौंदर्यांने भरपूर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. अनेक लोक तिला पसंत करतात, भरपूर चित्रपटातून ती आपल्या भेटीस आली आहे. त्यामुळे सर्वत्र तिची विशेष चर्चा सुरू असते, सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. नेहमीच आपले वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत असते जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

नुकताच तिचा “कॉफी विथ करण” या शोमधील एक व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या शोमध्ये करण जोहर यांनी साराला विचारले होते की “तुला कोणाशी लग्न करायचे आहे..?” या प्रश्नावर अगदी न अडखळता सारा ने जे उत्तर दिले ते ऐकून समोर असलेले तिचे वडील सैफ अली खान देखील थक्क झाले होते. सारा म्हणते की “मला कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे आणि रणबीर कपूर सोबत लग्न करायचे आहे….”

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रणबीर कपूर हे साराची सावत्र आई करीना कपूर हिचे भाऊ आहेत त्यामुळे नात्याने ते साराला मामा लागतात. साराने आपल्याला आपल्या मामाशी लग्न करायचे आहे ही गोष्ट धडधडीत सांगितली. यावर करण जोहर यांनी सैफ यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर सैफ म्हणतात की “माझ्या मुलीला जो पसंद असेल त्याच्याशी मी दोन तीन प्रश्न करेन. जस की त्याचा पॉलिटिकल व्यु काय आहे किंवा ड्रग संबंधित काही प्रश्न करेन.

माझ्या मुलीला जो पसंद येईल तो मलाही पसंद येईल.” त्यांची ही प्रतिक्रिया खूप चर्चेत आहे. कारण एरवी सामान्य कुटुंबात मुलीला पसंद आलेल्या मुलाला वडील किंचित पसंद करतात. किंवा काही वेळा वडिलांनी परवानगी न दिल्याने अनेक मुलींना त्यांच्या आवडीचा मुलगा मिळत नाही. मात्र सारा सारख मुलींनी धाडसी होऊन सांगितलं पाहिजे. कारण कोणी आवडणं यात गौर काहीच नाही. फक्त ते धडधडीत सांगता आलं पाहिजे.

सारा चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर विशेष चर्चेत आला आहे, अनेक लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. तुम्हाला तिच्या व्हिडीओ वर काय वाटत ते आम्हाला कमेंट करून सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.