प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर यांची पत्नी..आहे एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रींची बहीण..!

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार काम करतात. आपल्या अभिनयाने ते लोकांचे मन जिंकून घेतात. फिल्म इंडस्ट्रीत काही कलाकार हे नायक तर काही खलनायक म्हणून काम करतात. असच बॉलिवूड मधला एक अभिनेता तो म्हणजे शक्ती कपूर. ज्यांचे खरे नाव ‘सुनील सिकंदरलाल कपूर’ असे आहे.

पण आपल्या खलनायकाच्या पात्राला शोभेल असं नावं म्हणून त्यांचे नाव ‘शक्ती कपूर’ असे पडले. पंजाबी कुटुंबात ३ सप्टेंबर १९५८ ला दिल्ली मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी ही सुरवातीला खूप कष्ट करावे लागले. नवी दिल्ली मध्ये त्याच्या वडीलांच्या कपड्याच्या दुकानात शक्ती कपूर कपडे शिवण्याचे काम करत होते.

सुनील दत्त हे आपल्या मुलाला चित्रपटात घेण्यासाठी रॉकी हे चित्रपट बनवत होते, तेव्हाच शक्ती कपूर ला बघून त्यांनी खलनायकाच्या भूमिकेसाठी घेतले. आजपर्यंत त्यांनी खूप चित्रपटात काम केलं आहे. त्यांच्या सगळ्याच चाहतेना त्यांनी केलेल्या व्हिलनच्या भूमिका खूप आवडतात. तसेच अनेक विनोदी भूमिका ही स्वीकारल्या आहेत. गोविंदा आणि त्याची जोडी खूपच प्रसिद्ध झाली. त्यांनी ७०० पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. हे सगळ्यांना नवलच वाटेल.

एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या बहिणी सोबत शक्ती कपूर यांचा विवाह झाला. शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर हिने सुद्धा आपल्या वडीलाप्रमाने बॉलीवुड इंडस्ट्रीत स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. ती एक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.

हिच्या बॉलीवुड करियर बद्दल आपल्याना माहीतच आहे. शक्ती कपूर यांच्या कारकिर्दी बद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तर आज आपण जाणून घेऊया त्यांच्या शक्ती कपूर यांच्या पत्नी बद्दल…या दोघांचे लग्न कसे जमले? तसेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री असणारी त्यांची बहीण कोण? चला पाहूया…

शिवांगी कोल्हापुरे अस त्यांच्या पत्नीचे नाव आहे. नावावरून तर तुम्हा सगळ्यांना ओळखलेच असणार हो ना. पद्मिनी कोल्हापुरे जी ८० च्या दशकातील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती, त्यांचीच बहीण शिवांगी. शिवांगी कोल्हापुरे आणि शक्ती कपूर यांचा विवाह १९८२ मध्ये झाला होता. दोघांचे लग्न पण एका चित्रपटाला साजेल अश्या पद्धतीने झाले होते. ते आता कसे झाले हे आपण पुढे पाहूया.

अस म्हणल जात की या दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं. त्याचा प्रेमविवाह होता. मुंबई मध्ये शिवांगीचा जन्म झाला. पंढरीनाथ अस त्यांच्या वडीलांचे नाव होते तर अनुपमा ही त्यांची आई. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर बॉलिवुडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून करियर सुरू करणाऱ्या या शिवांगी ने काही काळानंतर एक अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली. फिल्मी पद्धतीचा त्यांचा प्रेम कहाणीचा किस्सा जो मनोरंजक आहे चला पाहूया.

‘किस्मत’ सिनेमाच्या वेळी या दोघांची ओळख झाली होती. एका प्रोडूसरला पद्मिनी कोल्हापुरे यांना किस्मत सिनेमासाठी साईन करायचे होते. पण पद्मिनी कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थित त्यांची बहीण म्हणजेच शिवांगी यांना त्या सिनेमासाठी साईन केले.
या चित्रपटाच्या सेटवरच शक्ती कपूर आणि शिवांगी या दोघांना प्रेम झाले. शिवांगीचे आई वडील हे या दोघांच्या लग्नाच्या विरोधात होते कारण त्यांना हे नातंच मान्य नव्हते.

शिवांगी १८ वर्षाची होती तेव्हा त्यांनी लग्न केले. लग्नानंतर शिवांगीने सिनेमात काम करणे बंद केले आहे. १८ वर्षात शिवांगीने शक्ती कपूर यांच्यासोबत कोर्ट मध्ये लग्न केले. आज शक्ती कपूर आणि शिवांगी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी श्रद्धा कपूर आणि मुलगा सिद्धांत कपूर होय. अशी होती या दोघांची प्रेमकहाणी. सध्या हे कुटुंब गुण्यागोंविदानं राहत आहे आणि सुखी जीवन जगत आहे.

शिवांगी आणि शक्ती कपूर या दोघांनाही त्यांच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा..! तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला. हा लेख कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा. हा लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करत रहा. धन्यवाद..