या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होणार क्रिकेटर मिताली राजच लग्न? बांधणार लवकरच लग्नगाठ..!

मिताली राज हे नाव क्रीडा रसिकांसाठी नवीन नाही. एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी मिताली राज भारतीय महिला संघाचं कर्णधारपद सांभाळताना दिसत आहे. वयाच्या २२ व्या वर्षापासून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळते आहे. क्रिकेट जगतातले अनेक विक्रम मितालीच्या नावावर आहेत. २०१९ मध्ये क्रिकेटमध्ये २० वर्षांची कारकीर्द गाठणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. २००३ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने तर २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mithali Raj (@mithaliraj)

अशा या खेळाडू बद्दल जाणून घेण्यासाठी क्रीडा रसिकांची उत्सुकता वाढली नसेल तरच नवल! तिचा आयुष्यभराचा साथीदार कोण असणार आहे, तिला कसा मुलगा हवा आहे याबद्दल क्रीडा रसिकांमध्ये आणि मितालीच्या चाहत्यांमध्ये नेहमीच औत्सुक्य राहिलेलं आहे. अलीकडेच तिचा आदर्श साथीदार कसा असावा याबाबत ती बोलताना दिसली.

मिताली राज आपल्या सहकारी क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, झुलन गोस्वामी यांच्याबरोबर ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावताना दिसून आली. यावेळी कपिल शर्माने त्यांना ‘तुला क्रिकेटरशी लग्न करायचे आहे की एखाद्या बॉलिवूड कलाकाराशी?’ असा गमतीदार प्रश्न विचारला. यावर मितालीने दिलखुलास उत्तर दिले. तिने सांगितले, की एखाद्या बॉलिवूड कलाकाराशी लग्न करायला माझी हरकत नाही. मात्र मला जो आवडतो त्याचं लग्न झालं आहे. माझा आवडता अभिनेता आमिर खान आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mithali Raj (@mithaliraj)

आपल्या शो मध्ये कपिलने अनेकदा सांगितले आहे, की त्याला दीपिका पदुकोण फार आवडते. याच अनुषंगाने हरमनप्रीत कौरने कपिलच्या प्रश्नाचे उत्तर दिले. हरमनप्रीतने मिश्कीलपणे सांगितले, की मला रणवीर सिंग आवडतो, मात्र तो त्याच्या पत्नीसोबत सेट आहे. वेदा कृष्णमूर्तीही यावेळी मस्करीच्या मूड मध्ये दिसून आली. ती म्हणाली, ‘तुला दीपिका आवडते, मला रणवीर आवडतो. आम्ही दोघं सेटिंग करून घेऊ.’ झुलन गोस्वामीने सांगितले, की तिला शाहरुख खान आवडतो.

मिताली राजचं पहिलं प्रेम क्रिकेट नव्हतं. आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून ती क्रिकेटपटू बनली. तरीही तिने क्रिकेट जगतात अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवून घेतलेले दिसतात. मितालीला नृत्याची आवड होती. तिला लहानपणापासून नृत्यांगना व्हायचे होते. तिने भारतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले आहे. मितालीने जरी गंमतीत तिला आमिर खानशी लग्न करायला आवडलं असतं असं सांगितलं असलं, तरी तिचे चाहते ती आपला जोडीदार म्हणून कोणाची निवड करते याकडे लक्ष लावून बसले आहेत.