“अश्लील चित्रपटात काम करणार का”? राज कुंद्राने लोकप्रिय युट्यूबर पुनीत कौरला केली होती विचारणा..

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती व प्रसिध्द उद्योगपती राज कुंद्राला अ’श्लील चित्रपटांची निर्मिती आणि अ’श्लील अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अ’ट’क करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अ’ट’केनंतर अनेक गोष्टींचे धागेदोरे समोर आले आहेत.

राज कुंद्रा अ’श्लील चित्रपट प्रकरणी अनेकांनी समोर येत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता एक लोकप्रिय युट्यूबर पुनीत कौरहीने राज कुंद्राने तिला “अ’श्लील चित्रपटात काम करणार का”? असे विचारले होते, असा धक्कादायक दावा या युट्यूबरने केला आहे.

राज कुंद्राच्या अट’केनंतर अनेजण त्याच्या विरोधात तर काहीजण त्याच्या बाजूने बोलत आहेत. त्याचे हे अ’श्लिल चित्रपटाचे प्रकरण समोर आल्यानंतर शिल्पा शेट्टी देखील माध्यमांपासून थोडा दुरावा ठेवत असल्याचे दिसत आहे. राज कुंद्रा याला अ’श्लील चित्रपट प्रकरणी अटक झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आता नवनवीन खुला’से होताना आहेत. अशातच आता पुनीत कौर या युट्यूबरने इन्स्टास्टोरीवर राज कुंद्राबद्दल एक धक्कादायक खु’लासा केला आहे. “माझे व्हिडीओ पाहिल्यानंतर राज कुंद्राने मला हॉ’ट’शॉट अ’श्लील व्हिडीओंमध्ये काम करणार का? अशी विचारणा केली होती. त्याचा मॅसेज आला होता. आधी हा स्पॅम मॅसेज आहे, असे मला वाटले होतो.” असे तिने इंस्टास्टोरीमध्ये पोस्ट केले आहे.

त्यानंतर तिने लिहिले की, “हा माणूस इतका नीच आहे, यावर माझा विश्वास बसेना. देवा, याला तुरुंगातच सडू दे,” अशा शब्दांत तिने तिचा राग व्यक्त करत धक्कादायक खुलासा केला आहे. पुनीत ही एक लोकप्रिय युट्यूबर आहे. तीने काही जाहिरातीमध्ये देखील काम केलेआहे. ती सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

दरम्यान, अश्लील चित्रपट प्रकरणी सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. काल त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आले. कोर्टाने त्याला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राज कुंद्रावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील चित्रपट तयार करून विकल्याचे गंभीर आरोप आहेत.