‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर मालिका संपल्यानंतर आली अशी वेळ, ऐकून विश्वास बसणार नाही..

झी मराठीवरील एक अत्यंत प्रसिद्ध मालिका “तुझ्यात जीव रंगला” ही आता सध्या संपून गेली आहे. पण यातला राणा दा आणि पाठक बाई अजूनही आपल्या लक्षात असतील. या दोघांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. अंजली पाठक बाई यांची आणि राणा दा ची आगळीवेगळी लव्ह स्टोरी सगळ्यांनाच आवडली होती. या दोघांनी या मालिकेत अप्रतिम अभिनय केला होता.

अंजली पाठक बाई यांचे खरे नाव अक्षया देवधर असे आहे. ती सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मुलाखतीदरम्यान तू मालिकेनंतर सध्या काय करत आहेस असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली की मी सध्या आराम करते आहे आणि स्वतःला वेळ देत आहे. ती सध्या तिचे छंद जोपासत आहे. नवनवीन गोष्टी शिकत आहे. घरच्या लोकांना वेळ देत आहे. ती सध्या सोशल मिडीयाचा योग्य वापर कसा करता येईल याचा विचार करत आहे.

तिच्या म्हणण्यानुसार कलाकार हा त्याच्या चाहतावर्गाशिवाय शुन्य आहे. चाहत्यांचा पाठींबा असतो म्हणूनच कलाकार हा उभा राहू शकतो. नाव कमवतो. त्याला पुढे नेणारे हे चाहतेच असतात. पण म्हणून सोशल मिडीयावरून त्यांना जज करणं योग्य नाही. वैयक्तिक आयुष्य आणि पडद्यावरचं आयुष्य याची सरमिसळ कुणीही करू नये. अशा प्रकारे पाठकबाईंनी अगदी आपल्या खमक्या थाटात या गोष्टी सांगितल्या आहेत. अक्षया ही नेहमीच आत्मविश्वासाने बोलत आलेली आहे. तिच्या अभिनयातही तो दिसून येतो.

फॅशन म्हणजे नक्की तुझ्यासाठी काय असा प्रश्न विचारल्यानंतर अक्षया सांगते की, “ज्यात मी कम्फर्टेबल असते तीच माझ्यासाठी फॅशन आहे. अक्षया म्हणून माझी आवड पारंपरिक वा फार तर इंडो-वेस्टर्नकडे झुकणारी आहे. उगाच प्रदर्शन करणारे पेहराव मला रूचत नाहीत.

माझ्यासाठी अभिनय ही मानधनापलीकडची गोष्ट आहे. तुलना होत राहील मात्र मराठीतल्या सगळ्या ज्येष्ठ अभिनेत्री आजही उत्तम काम करत आहेत. तुमची इच्छा चिरतरुण असेल, तर तुमचा करिअर स्पॅन तुमच्याच हाती आहे. ”

अक्षयाच्या म्हणण्यानुसार लोकांच्या म्हणण्यावरून तुम्ही गोष्टीची परिमानं ठरवता कामा नये. आपल्याला जे सूट होतं किंवा आवडतं ते आपण करत राहिलं पाहिजे. अक्षयाने नुकतेच काही फोटोशूट केले आहेत. त्यात ती अत्यंत देखणी दिसली आहे.

अक्षयाचा रुबाब ही तिची खरी ओळख आहे. अक्षयाचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांना भावत आलाय. सोशल मिडीयावर तिच्या या अदांवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसून येतो.

पात्रांच्या निवडीविषयी तिला प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा अक्षया म्हणाली की, “दर वेळी मला मुख्य नायिकेचीच भूमिका हवी असा आग्रह नाही. मला कॅरेक्टर रोल करायलाही आवडेल. ग्लॅमरस भूमिकांसाठी मी अजून तयार नाही; पण मला सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत. ऐतिहासिक भूमिकेसाठी विचारणा झाली तर निश्चितच साकारायला आवडेल.” याचाच अर्थ अक्षया ही कुठलीही भूमिका विचारपूर्वक निवडते.

अक्षया सध्या तिच्या पुढील भूमिकांसाठी स्वतःला तयार करते आहे. स्वतःवर काम करते आहे. स्वतःच्या अभिनयावर काम करते आहे. तसेच स्वतःला लॉकडाऊनच्या काळात स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. अक्षयाला तिच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.