या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केले टक्कल, सोशल मीडियावर व्हायरल फोटो…जाणून घ्या कारण

मित्रहो कलाकार आपल्या भूमिकेसाठी काहीही करायला तयार असतो आणि हेच त्यांचं मोठं धाडस असते. मित्रहो अशीच एक धाडसी अभिनेत्री सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे, तिच्या टक्कल करण्यामागे नेमके काय कारण आहे याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. मित्रहो ही अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील “फुलला सुगंध मातीचा” या मालिकेतील इमलीची भूमिका साकारणारी मधुरा जोशी आहे. मधुरा या मालिकेतून खूप लोकप्रिय झाली आहे, तिच्या भूमिकेचे खूप कौतुक सुद्धा होत असते.

View this post on Instagram

A post shared by MADHURA GURUDATTA DIVEKAR✨ (@itsmadhurajoshi)

मधुरा जोशी ही सोशल मीडियावर सुद्धा नेहमी सक्रिय असते. तिच्या अनेक पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात, शिवाय तिचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील विशेष चर्चेत असतात. दरम्यान तिचा नुकताच सोशल मीडियावर एक लुक भलताच चर्चेत आला असून, तिचा हा व्हायरल फोटो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. कारण शक्यतो सर्व अभिनेत्री आपले सौंदर्य वाढावे यासाठी प्रयत्नात असतात, त्यामुळे त्या नेहमी निरनिराळे प्रयोग स्वतःवर करत असतात.

मात्र मधुराने आपल्या सौंदर्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे केस, यांनाच कापून टाकले आहे. तिने चक्क टक्कल केले आहे. तिचा हा टक्कल केलेला फोटो पाहून अनेकजण चकित झाले आहेत, सोशल मीडियावर तिच्या फोटोवर खूपशा निरनिराळ्या कमेंट येत आहेत. काहींनी तिला विचारले आहे की तुझी तब्येत ठीक नाही का..? तर काहीजण म्हणत आहेत की हा लुक तुझ्या नव्या भूमिकेसाठी आहे का…? तर काहींनी तिला काळजी घ्यायला सांगितली आहे. पण असे असले तरीही हा फोटो पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडतोच.

View this post on Instagram

A post shared by MADHURA GURUDATTA DIVEKAR✨ (@itsmadhurajoshi)

तर मित्रहो मधुरा एका हिंदी मालिकेत सध्या कार्यरत आहे, ही मालिका म्हणजे “पुण्य श्लोक अहिल्या” आहे. या मालिकेत मधुराने आपली भूमिका साकारण्यासाठी चक्क टक्कल केले आहे. एक कलाकार म्हणून तिने रसिकांचे मन जिंकले आहे, कारण आपले केस कापणे म्हणजे एक धाडसाचीच बाब आहे. त्यात एका स्त्रीसाठी तर हे काम अवघडच होते. पण आपल्या भूमिकेसाठी तिने आपल्या केसांना सुद्धा हसत हसत गमावले आहे.

मधूरा जोशी आता सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय होत आहे, तिची अनेकजण चर्चा करत आहेत. शिवाय तिचे व तिच्या भूमिकेचे सुद्धा कौतुक होत आहे. तिने केलेल्या या कृत्याला अनेकांनी छान छान कमेंट केली आहे, तर काहींना तिची काळजी वाटत असल्याने त्यांनी तिला काळजी घेण्यास सांगितले आहे. मधुरा नक्कीच तिची ही भूमिका सुद्धा गाजवणार. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.