उद्योगपतींशी लग्न करून बॉलिवूडच्या या ५ अभिनेत्री बनल्या आहे रातोंरात अब्जावधीं मालमतेच्या मालकीण..

बिझिनेस वर्ल्ड आणि बॉलिवूडमधील नातं खूप जुने आहे. व्यवसाय जगात आणि बॉलिवूडमधील मैत्री व्यतिरिक्त प्रेमाची अशी काही नातीही पुढे आली जी नंतर सातफेऱ्यात बदलली. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटांव्यतिरिक्त या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांमध्ये आपले प्रेम दर्शवले. मग टीना मुनिमचे अनिल अंबानीवरचे प्रेम असो वा शिल्पा शेट्टी यांचे राज कुंद्राबद्दल प्रेम.

जूही चावला- जय मेहता
जूही चावलाने १९९५ मध्ये जय मेहताशी लग्न केले. जुही यांचे पती जय मेहता हे बहुराष्ट्रीय कंपनी मेहता ग्रुपचे मालक आहेत. त्याच्याकडे दोन सिमेंट कंपन्या आहेत.

टीना मुनीम- अनिल अंबानी
टीना मुनीमने १९९१ साली रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनिल अंबानीशी लग्न केले. अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा
शिल्पा शेट्टीने बिजनेसमैन राज कुंद्राशी लग्न केले आहे. राज कुंद्रा हे लंडनमधील भारतीय वंशाचा प्रमुख उद्योजक आहेत. २००४ मध्ये त्यांनी ब्रिटनमधील १९८ श्रीमंत लोकांच्या रँकिंगमध्ये आपले स्थान बनवले होते. २००९ मध्ये त्यांनी शिल्पा शेट्टी बरोबर लग्न केले.

असिन-राहुल शर्मा
असिनने २००८ मध्ये ‘गजनी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि आजही तिने आपल्या अभिनय मुळे चांगले नाव मिळवले आहे. तिने १९ जानेवारी २०१६ मध्ये बिजनेसमॅन राहुल शर्माशी लग्न केले. राहुल मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक आहे. तसेच असिन ख्रिश्चन आहे आणि राहुल हा हिंदू होता. त्यामुळे दोघांना आधी ख्रिश्चन पद्धतीने लग्न नंतर हिंदू पद्धतीने लग्न असे दोन वेळा लग्न करावे लागले.

गायत्री जोशी- विकास ओबेरॉय
शाहरुख खानबरोबर स्वदेश चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री गायत्री जोशीचे लग्न विकास ओबेरॉयशी झाले आहे. विकास ओबेरॉय हे रिअल इस्टेट टायकून म्हणून जगभर ओळखले जातात. ते मुंबईत रिअल इस्टेट कंपनी चालवतात. वृत्तानुसार ४६ वर्षांच्या विकासाची संपत्ती १.६ अब्ज डॉलर्स (१० हजार कोटींपेक्षा जास्त) आहे. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी गायत्री तिच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून साथ देत आहे.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.