अक्षय, दीपिका, आलिया समवेत या ७ बॉलिवूड स्टार्सजवळ नाही भारतीय नागरिकत्व, अजून कोण कोण यादीमध्ये जाणून थक्क व्हाल..

तुम्हाला माहिती आहे का ज्या बॉलिवूड स्टार्सनी भारतीय चित्रपटातून यश आणि लोकप्रियता मिळविली त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नाही. अक्षय, दीपिका आणि आलिया यांच्यासह इतर अभिनेतेही आहेत, ज्याच्याजवळ  भारतीय नागरिकत्व नाही.

अक्षय कुमार :
आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये देशभक्तीची भूमिका साकारणारा अक्षय कुमार ‘भारतीय नागरिक’ नाही. होय, अक्षय बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडले होते आणि कॅनडाचे नागरिकत्व घेतले होते. आम्ही तुम्हाला सांगू की, सुपरस्टार अक्षयला कॅनडाचे नागरिकत्व सन्मान म्हणून मिळाले आहे आणि त्याला कॅनडाच्या “युनिव्हर्सिटी ऑफ विंडसर” कडून मानद डॉक्टरेट लॉ पदवी देखील देण्यात आली होती. मात्र, नागरिकत्व घेण्याच्या प्रश्नावर एका मुलाखतीत अक्षयने सांगितले होते की, आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे. परंतु भारतीय कायद्यानुसार कोणताही भारतीय एकाच वेळी दोन देशांचे नागरिक होऊ शकत नाही. दुसर्‍या देशाचे नागरिकत्व घेताच भारतीय नागरिकत्व काढून टाकले जाते.

दीपिका पादुकोण :
सर्वात यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाणारी दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण भले बॅडमिंटन खेळले असतील आणि दीपिका कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात राहत असली तरी दीपिकाकडे भारताचे नागरिकत्व नाही. वास्तविक, दीपिकाचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला आहे, म्हणून तिचे डॅनिश नागरिकत्व तसेच पासपोर्ट सुद्धा तिथलेच आहे.अक्षय कुमारप्रमाणेच तिने असा दावा केला  की तिच्याकडे डेन्मार्क आणि भारत या दोघांचेही नागरिकत्व आहे, परंतु भारतीय कायद्यानुसार असे करणे शक्य नाही.

आलिया भट्ट :
महेश भट्ट यांची छोटी मुलगी आणि बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री,आलिया भट्ट यांनी अगदी लहान वयातच भारतीय चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे. आजकाल ती बॉलिवूडमध्ये बरेचं नाव कमावत आहे.आलियाजवळ भारतीय नागरिकत्व तसेच ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिचा पासपोर्टही ब्रिटनचा आहे.  वास्तविक,आलिया भट्टची आई सोनी रझादान यांचा जन्म ब्रिटिश (इंग्लंड शहर बर्मिंघम) मध्ये झाला आहे.  त्यांचे तेथील नागरिकत्व आहे. त्यामुळे आलियाकडेही ब्रिटिश पासपोर्ट असून तिथं नागरिकत्वही आहे.

इमरान खान :
आमिर खानचा पुतण्या म्हणून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा ‘जाने तू या जाने ना’ स्टार इम्रान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे.  पण तुम्हाला माहिती आहे काय की इम्रान खान देखील भारतीय नाही. इम्रान खान यांचे जन्मापासूनच अमेरिकन नागरिकत्व आहे.  २०१४ मध्ये त्याला भारतीय नागरिकत्व घ्यायचे होते, पण तसे होऊ शकले नाही आणि तो अजूनही अमेरिकन नागरिक आहे.

कॅटरिना कैफ :
कतरिना कैफने जरी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये नाव आणि प्रसिद्धी मिळविली असली तरी  ती भारतीय नागरिक नाही हे सर्वांना ठाऊक आहे. कतरिना कैफचे खरे नाव कतरिना टोरकुटो आहे. त्याचा जन्म हाँगकाँगमध्ये असून ब्रिटिश नागरिकत्वही आहे.

सनी लिओनी :
भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी,ज्यांचे खरे नाव करणजित कौर वोहरा आहे. त्या भारतात जन्मल्या असल्या तरी त्यांच्याजवळ भारतीय नागरिकत्व नाही. सनीकडे कॅनेडियन नागरिकत्व आहे.  बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी ती आपल्या पतीबरोबर तिथे राहत असे.पण, यापूर्वी सनी लिऑन अमेरिकेत राहत होती, म्हणून तिच्याकडे अमेरिकन नागरिकत्व देखील आहे.

जॅकलिन फर्नांडीस :
जॅकलिन फर्नांडिस आपल्या सर्वांना माहिती आहे.पण ती भारताची नागरिक नाही. बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणार्‍या श्रीलंकेच्या मूळ जॅकलिनचा जन्म बहरीन येथे झाला. २००६ मध्ये ती मिस युनिव्हर्स श्रीलंका होती.  जॅकलिनकडे श्रीलकेचे नागरिकत्व आहे. जॅकलिनचे वडील श्रीलंकेचे आहेत तर आई मलेशियन नागरिक आहेत.