अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात करिअर करायचे होते दबंग खान सलमानला, स्वतः सांगितली हि मोठी गोष्ट..

बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान अनेक गोष्टींमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. त्याचे चित्रपट, त्याचे वेगवेगळ्या रिऍलिटी शो मध्ये हजेरी लावणं, त्याचा वाढदिवस अशा सगळ्याच गोष्टींची चर्चा होते. सध्या त्याच्या ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. आपल्या मेव्हण्याबरोबर म्हणजेच सलमानच्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर म्हणजेच अभिनेता आयुष शर्मा बरोबर त्याने हा चित्रपट केला आहे.

येत्या २६ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ चा हा चित्रपट रिमेक असणार आहे. गेल्या महिन्यात २५ ऑक्टोबरला या चित्रपटाचा पहिला ट्रेलर लाँच करण्यात आला होता. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर सलमान खान फिल्म्स तर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

सध्या सलमान खान ‘बिग बॉस सिझन १५’ मधून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला पाहायला मिळत आहे. अलीकडेच त्याचा या रिऍलिटी शो च्या सेट वरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आपला चित्रपट ‘धमाका’ च्या प्रमोशनसाठी या सेट वर आला होता. या वेळी सलमान आणि कार्तिकमध्ये काही धमाल संवाद झालेले पाहायला मिळाले.

दोघांनी एक मजेशीर खेळही खेळला. कार्तिक त्याच्या नव्या चित्रपटात रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. हाच धागा पकडून सलमान खानने कार्तिकला काही प्रश्न विचारले ज्याची त्याने योग्य उत्तरे देणे अपेक्षित होते. सलमानने कार्तिकला विचारले, “मला कोणत्या ठिकाणी सुट्टी घालवायला आवडते- हिल स्टेशन की बीच?” यावर कार्तिकने “पनवेलचे फार्महाऊस” असे उत्तर दिले.

सलमानच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर मात्र कार्तिकला देता आलं नाही. सलमानने विचारले, “जर मी अभिनेता नसतो तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं?” कार्तिकला याचे उत्तर देता न आल्याने सलमाननेच याचे उत्तर दिले. सलमानने सांगितले, “जर सलमान खान अभिनेता नसता तर तो दिग्दर्शकीय क्षेत्रात असता आणि तुम्ही दिग्दर्शक सलमान खान सोबत काम करत असता.” यावर सलमानने पुढे सांगितले, की मी दिग्दर्शक असतो तर मला कुणी प्रतिस्पर्धी देखील नसता.

कार्तिकने यावर लगेच “सर, मला तुमच्या चित्रपटात घ्या” असे गमतीत सांगून टाकले. गमतीत का होईना, प्रेक्षकांना पहिल्यांदाच सलमानची इच्छा ऐकायला मिळाली. विचार करा, जर सलमान खान अभिनेता नसता तर आज तुम्हाला दिग्दर्शक सलमान खानचे चित्रपट पाहावे लागले असते. तुम्हाला ते आवडले असते का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.