भारतात झिरो रुपयांची नोट देखील छापली होती, या मागील कारण जाणून घ्या….

मित्रहो आजवर आपण खुपशा नोटा पाहिल्या असतील, नेहमीच व्यापार, व्यवहार होत असतो. कधी आपल्या हातात २० रुपयांची तर कधी १०० रुपयांची नोट येत असते. तर कधी ५००,१००० रुपयांच्या नोटा येत असतात. पण कधी आपण झिरो रुपयांची नोट पाहिलीय..? हे जाणून तुम्हीही खूप चकित व्हाल की भारतात झिरो रुपयांची सुद्धा नोट छापण्यात आली होती. पण सर्व नोटा छापणात्या RBI ने ही नोट छापली नाही. ही नोट २००७ साली 5th pillar यांनी छापली होती.

5th pillar ही तामिळनाडू मधील एक एनजीओ आहे, यांनी एकदम लाखो झिरो रुपयांच्या नोटा छापल्या होत्या. यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम यांसारख्या अनेक भाषांमध्ये या नोटा छापल्या होत्या. ही नोट खूप उपयोगी आहे, समाजात होत असलेल्या करप्शनवर आळा घालण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. लाच घेणे हा भारतातील मोठा गुन्हा आहे, त्यासाठी सस्पेंशन आणि जेल यांसारख्या शिक्षा देखील आहेत.

पण जेव्हा लाच मागण्याऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नागरिक ही झिरो रुपयांची नोट दाखवतील तेव्हा तो तिथेच गप्प होईल. एनजीओ चा हाच एक उद्देश आहे की जेव्हा कधी नागरिकांकडून कोणी अधिकारी लाच मागण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्या नागरिकाला झिरो रुपयाची नोट दाखवून यावर आवाज उठवता येतो. विशेष म्हणजे या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे. तसेच यावर “भ्रष्टाचार संपवा” असे लिहले आहे. “जर कोणी लाच मागितली तर ही नोट त्याला द्यावी आणि प्रकरण आमच्या कानावर घालावे” तसेच “ना घेण्याचे ना देण्याचे वचन करावे”.

सर्वात खाली उजव्या बाजूला संस्थेचा फोन नंबर लिहला आहे आणि इमेल आयडी सुद्धा छापला आहे. विजय आनंद हे 5th pillar चे सह संस्थापक आहेत. समाजातील प्रत्येक स्तरावरील भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी ही संगठना कार्यरत असते. येणाऱ्या पिढीला मजबूत बनवणे, निर्णयांचे पालन करण्यास शिकवणे तसेच पर्यावरण संरक्षण करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचार मुक्त देश बनवण्यास उत्तम मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. असे या संस्थेचे म्हणणे आहे.

5th pillar या संस्थेने १६०० पेक्षा अधिक शाळांमध्ये आणि महाविद्यालयात जाऊन या आपल्या झिरो नोट बद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले आहे. समाजात यामुळे खूप मोठा बदल घडवून आणला जाईल हे नक्की. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.